सदस्यांसाठी सर्वसाधारण मार्गदर्शन

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
(Redirected from लिखाण करा)
Jump to: navigation, search

सिटीपीडियावर शहरे, शहरीकरण आणि शहरातील समस्या यावर आपण लिखाण करू शकता.. सिटीपीडियातील लेख नागरिकांनी लिहावेत आणि एडीट करावेत असेच अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणार आहे खऱ्या नावाने, फोन क्रमांक आणि email ID पुरवून रजिस्ट्रेशन करणे. सिटीपीडिया बघण्यासाठी आणि वाचण्यासाठी सर्वांना मोफत उपलब्ब्ध असेल. लिहिण्यासाठी मात्र सदस्य होणे गरजेचे आहे. सदस्य होण्यासाठी विनंती-अर्ज करा. एकदा तुम्ही सदस्य झालात कि नवीन लिखाण करू शकता किंवा आधीच्याच लेखात ते अधिक माहितीपूर्ण करण्यासाठी तुम्ही बदल करू शकता.. आपल्या सगळ्यांच्या लिखाणाने हे संकेत-स्थळ अधिक उपयुक्त होत जाणार आहे.

सिटीपिडीयावरील आपले लिखाण मराठीत असावे, ते खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर असावे

शहरीकरण / लोकसंस्कृती / शिक्षण / सार्वजनिक आरोग्य / सार्वजनिक वाहतूक / पर्यावरण / कचरा, स्वच्छता व सफाई / निवारा प्रश्न / शहर-नियोजन / आपल्या शहरातील लक्षणीय बातम्या

सदस्य कसे बनावे

मुख्य पान उघडल्यावर वरच्या उजव्या कोपऱ्यात 'Request Account' या अक्षरांवर क्लिक करून आपला फॉर्म भरावा.

username शक्यतो नाव, आडनाव असे टाकावे. जसे उदा. 'Vishal Lokhande'. बाकी माहिती भरावी.

'Request Account' या निळ्या पट्टीवर क्लिक केले की तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला हा मेसेज दिसेल

Your account request has been sent and is now pending review. A confirmation email has been sent to your email address. Return to Main Page.

तुम्हाला एक e-mail address confirmation mail येईल, कदाचित spam folder मध्ये, त्या लिंकवर एका महिन्याच्या आत confirmation करावे लागेल.

आम्ही तुमचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल. कदाचित spam folder मध्ये.. त्यात पासवर्ड असेल. पहिल्यांदा आम्ही दिलेला पासवर्ड वापरून login करा

पासवर्ड बदला, झाले ... तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

आता दर्शनी पानाच्या वर उजव्या कोपऱ्यात 'Vishal Lokhande' ही अक्षरे झळकलेली दिसतील. आता तुम्ही लेखन आणि आधीच्या लेखांत दुरुस्त्या, भर टाकायला सिद्ध होता.

याबद्दल अधिक माहिती आणि मार्गदर्शन, प्रशिक्षण सिटीपीडिया कार्यकर्त्यांकडून उपलब्ध केले जाईल.

इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे सिटीपीडिया बघण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तर लेख आणि एडीट करण्यासाठी मात्र असेल.


सिटीपीडियात सहभाग घेण्यासाठी नियमावली

१.सिटीपीडीयावर लिहीतांना समाजात तेढ निर्माण होईल असे लिहू नये.

२.सिटीपीडीया आणि ठाणे मतदाता जागरण अभियान भारतीय संविधानाची चौकट मान्य करते. त्यामुळे या चौकटीत व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य व जबाबदारी आम्ही मानतो.

३.लिहीणार्याने आपले खरे नाव, फोन व इमेल लिहीणे गरजेचे आहे.

४.लिखाणाची पूर्ण जबाबदारी लेखकाची असेल.

५.सिटीपीडीयाचे संपादकत्व सामूहीक आहे. प्रत्येक लिहीलेल्या वाक्याशी सिटीपीडीया आणि ठाणे मतदाता जागरण अभियान सहमत असेलच असे नाही.

६.यातून उद्भवणार्या कायदेशीर बाबींकरता लेखक व्यक्तीश: जबाबदार असेल.

७.सिटीपीडीया म्हणून कायदेशीर ज्युरीसडीक्शन ठाणे असेल.

८.सिटीपीडीया लिखाण करण्याकरता कोणताही चार्ज,देणगी, वा निधी घेत नाही.

लिहिण्याकरता सदस्य होतांना जो फॉर्म मान्य करून ऑनलाईन भराल त्यात वरील बाबींचाही समावेश असेल.


सिटीपिडीया - आमचा दृष्टीकोन, आमची अपेक्षा

सिटीपीडियामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद तसेच अन्य शहरातील कार्यकर्ते आपले लिखाण करीत हा संदर्भ ग्रंथ परिपूर्ण करीत जातील आणि सिटीपीडिया बनेल एक मोठा शहरीकरणाचा दस्तावेज.

सिटीपीडियामध्ये एखादा विषय शोधायचा असेल तर मुख्य किंवा दर्शनी पानावर वरच्या बाजूला 'शहरीकरण', 'शहरी नियोजन', 'निवारा प्रश्न', 'शिक्षण/आरोग्य', 'कचरा स्वच्छता', 'शहरी वाहतूक', 'स्थानिक स्वराज्य', 'लोक-संस्कृती', 'पर्यावरण' असे विविध विषय आडवे दिसतील. तुम्हाला पाहिजे त्या विभागावर क्लिक केले की त्या त्या विभागाचे वेगळे पान उघडेल. त्या पानावर त्या विभागाच्या विषयाची संक्षिप्त माहिती असेल. तसेच Category या अक्षरांखाली त्या विषयाशी संबंधित विविध पोटविभाग दिसतील. त्यातील एखाद्यावर क्लिक केल्यास लेख दिसतील. मग तुम्ही एखाद्या लेखावर क्लिक करून तो उघडून वाचू शकता.

या सर्वाला एक सोपा पर्याय देखील उपलब्ध आहे. तो म्हणजे दर्शनी पानावरील अगदी वरच्या कोपऱ्यात असलेले search इंजिन. पण त्याचा तेव्हाच उपयोग असतो की जेव्हा आपल्याला लेखाचे नेमके शीर्षक माहीत असेल.

सिटीपीडिया कसा वापरावा याबद्दल अधिक माहिती आणि मार्गदर्शन, प्रशिक्षण सिटीपीडिया कार्यकर्त्यांकडून उपलब्ध केले जाईल.

सिटीपीडिया मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषात असेल. तो वाचायला, शहरीकरणाच्या संदर्भातला एखादा विषय समजून घेण्यासाठी सर्वांना उपलब्ध असेल. इतकेच नव्हे तर तज्ञांच्या बरोबरीने सर्वसाधारण व्यक्ती त्यात आपले लेखन करू शकतील, मते व्यक्त करू शकतील, आपली सुखदुःखे मोकळेपणे मांडू शकतील. सीटीपीडियातील लिखाण सोपे, पटकन वाचण्यासारखे असेल आणि त्याचवेळी दर्जेदार असेल असा प्रयत्न राहील.