Portal:सार्वजनिक वाहतूक

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
Jump to: navigation, search


सार्वजनिक वाहतूक

पर्यावरणशास्त्र किंवा इंग्रजीत इकॉलॉजी (ecology) म्हणजे नेमके काय? पर्यावरणशास्त्र म्हणजे एक असे शास्त्र, की जे जीवसृष्टीचा प्रसार, विस्तार नेमका कसा होतो आणि या प्रसार-विस्तारावर जीवसृष्टी आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर क्रियाप्रतिक्रिया आंदोलनांचा प्रभाव नेमका कसा पडतो याचा उलगडा करून दाखवण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र असे थोडक्यात म्हणता येईल.

इथे अजून एक गुंतागुंत आहे जी हळुवारपणे उलगडायला हवी. ती म्हणजे 'पर्यावरण' म्हणताना त्याला दोन बाजू असतात. एक म्हणजे अ-जैविक बाजू, जसे सौर ऊर्जा, उष्णता, हवामान, भौगोलिक स्थिती वगैरे आणि दुसरी बाजू म्हणजे जीवजंतू एकमेकांबरोबर एकत्रित स्थानिक अधिवास उपभोगत असतात ती जैविक बाजू. या दोन्ही बाजू एकत्रित धरूनच 'पर्यावरण' या शब्दाचा अर्थ इथे घ्यायला हवा.

याचा अर्थ असाही होतो की, पर्यावरणशास्त्राकडे पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वगैरे जड शास्त्रांसारखे न बघता जीवसृष्टीचे शास्त्र, किंवा त्याहीपलीकडे जाऊन सामाजिक शास्त्र म्हणूनच बघितले पाहिजे.

एकविसाव्या शतकात शहरीकरणाची जी घोडदौड चालू आहे त्यामुळे शहरीकरणाची प्रक्रिया आणि मानवी समाजाचे भवितव्य हे विषय ऐरणीवर आले आहेत. त्यातून असा विचार बळावला आहे की शहरीकरण प्रक्रियेकडे पर्यावरणशास्त्र किंवा इकॉलॉजी प्रमाणे बघावे. इथे इकॉलॉजीची तुलना सजीवाच्या शरीराशी केली आहे. ज्याप्रमाणे प्राण्याचा जीवनव्यवहार चालू असतो ज्यात सर्व बाबींचे संतुलन साधत जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यवहार चालतो. तसेच शहराविषयी कल्पून स्वस्थ शहररचना करण्याचा प्रयत्न करता येईल.

हा विचार आकर्षक नक्कीच आहे. पण तो प्रगत जगाला कदाचित जास्त लागू पडत असावा. परंतु प्रगत जगातील शहरीकरण आणि आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकी मागासलेल्या बहुसंख्य जगातील शहरीकरण यांच्यात जमीनअस्मानाचे अंतर आहे. मागास जगतातील शहरीकरण म्हणजे झोपडपट्ट्यानी आलेले बकालीकरण ज्यात बहुसंख्य कष्टकरी जनता हलाखीचे जीवन जगत असते. त्यांच्या कष्टातून उभारलेल्या शहरातून त्यांना हद्दपार करीत शहर वाढत राहाते. बेदखलीतून भांडवलसंचय हा येथे अलिखित नियम आहे.

त्यामुळे पुढारलेल्या जगतातील शहरविकास शास्त्रातून योग्य-अयोग्यची निवड करीतच वाटचाल करावी लागेल. ही परिपकवता धोरणकर्त्यांत दिसत नसल्याने नागरिकांचे जागरण आणि सहभाग आवश्यक ठरतो.

या विषयावरील लेखांची वर्गवारी

 या विषयावरील एक लक्षणीय व्हिडीओ

ABCD
1234

ह्या विषयांवर काम करणारे समन्वयक

Rohit Joshi
Sunti Mokashi

इतर महत्त्वाची माहिती

ABCD
1234

 तुम्ही काय करू शकता

ABCD
1234